संगणक माझा सोबती
Computer is my companion


                 1970 सालात हिंदुस्थानात संगणक आला. झटपट काम करणारे जादुचे यंत्र अशी किर्ती असलेला हा संगणक इंग्रजी पुस्तकात धडा म्ह्णुन होता.
  
               त्या काळातला संगणक अत्यंत कमी स्मरणशक्ती साठ्वणारा भल्या मोठया आकाराचा होता. त्यात विशिष्ट पंचकार्ड वापरले जायचे. आता लॅपटॉप, पामटॉप असेछोटेछोट आणी भरपुर स्मरणशक्ती असलेले संगणक जागतिक जीवनाच महत्वाच्अंग होत चालले आहेत.

               या जुन्या आठवणींवर जुन्या कमी स्मरणशक्तीच्या फ्लॉपी, सीडी वापरात असणारे मोठे मोठे संगणक भंगारात जाउन छोटे छोटे जास्त स्मरणशक्ती साठ्वणारे संगणक या भुतलावर अवतरले. स्टीव्ह जॉबज याने हा संगणक स्वतःच्या वडीलांच्या गॅरेजात बनवला तेव्हां त्याची किंमत 666 डॉलर एवढी होती.
     
               केबी,एमबी,जीबी,टी.बी करीत संगणक स्मरणशक्ती वाढ्वत गेला. त्याचा जगातील वापरही वाढत गेला नेट,फेसबुक,आयपॉड अशी उत्क्रांती ही वाढत गेली संगणकाने मानवी जीवनातली  सर्व क्षेत्र कमी वेळात व्यापुन टाकली. त्यामुळे माणसाच्या जीवन शैलीचा चेहरा मोहराच संगणकाने बदलुन टाकला.    आणी आता तर संगणकाच्या करामतीने खरा चेहराही बदलण शक्य झाल आहे. त्यामुळे त्याचा उपयोग जास्त प्रमाणात सिनेमा सृष्टीत व्हायला लागला आहे.
     
               ऑस्कर विजेते  60 वर्षीय अभिनेते जेफ बिजेश यांनी पुन्हा एकदा तिशीतल्या तारुण्यात नेण्याच काम संगणकाने केले आहे. त्यामुळे हा 60 वर्षीय म्हातारा 30शीतला तरुण म्ह्णुन चित्रपटात काम करणार आहे .आतापर्यंत एखादी व्यक्तीरेखा सिनेमात लहानपणापासुन वृद्धत्वापर्यंत दाखवताना किमान तीन जणांना ती साकारावी लागत असे आणी त्यामुळे काही बारकावे नजरेआड करावे लागत असत  संगणकातील सर्वात नवीन आणी धक्कादायक क्रांती आपल्या समोर आहे

                 हिंदुस्थानात संगणक आला तेंव्हा परदेशात रहाणारी आपली मुल रोज रात्री आपल्याशी बोलु लागली तिथे काय करताआहेत ते घर बसल्या दिसु लागली. त्यामुळे मुल लांब गेल्याच दुःख कमी झाल. मुल घरातच असल्याचा भास होऊ लागला. त्यामुळे सुखदुःख वाटता आली ही हिंदुस्थानातील्आईबाबांना एक पर्वणीच ठरली.जे काही मनात आहे ते संगणकामुळे दाखवु बोलुही शकली.

                 संगणकावर आपले विचार कथा, कविता,पाककृती,गोष्टी लिहिता येतात त्यासाठी प्रकाशकाची किंवा वृत्तपत्रकारांची गरज लागत नाही. प्रसिद्धिसाठी कुठल्याही माद्धमाची गरज नाही. जो संगणक वापरतो तो ती माहीती वाचु शकतो आणी आजच्या घट्केला संगणक वापरणारा मिळणच कठिण झाल आहे त्यामुळे संगणक माणसाचा मित्र,सोबती झाला आहे.

                 पुस्तक वाचा ,गाणी ऐका,चित्र काढा पत्ते खेळा किंवा इतरही विविध खेळ खेळा एकाच वेळी बर्याच व्यक्तींशी चाट करा स्वतःची कामे करा,हिशोब ठेवा किंवा दुसर्याकडुन माहीती मिळ्वा आपल्याकड्ची माहीती दुसर्याला पोहचवा अगदी क्षणात शक्य झाले आहे.

                आज संगणकाचा आकारही लहान म्हणजे आपल्या तळहाताएवढा झाला आहे. आणि किंमतही पहिल्यापेक्षा खुपच कमी झालेली आहे ज्यांना टाईप करायचा कंटाळा आहे त्यांना संगणकावर विशिष्ट काठीने लिहीता येत. लिहिलेले जतनही करता येत. पुस्तकरुपी छापताही येत किती गोष्टी हा संगणक करतो. जादुच कपाट म्ह्णाव इतकी मजल हया संगणकाने मारली आहे.आपण जाऊ तिथे त्याला बरोबर नेता येत  खर्या अर्थाने संगणक माणसाचा सोबती झाला आहे

                 आपल्याला हव्या त्या भाषा निवडीच स्वातंत्रही त्यात उपलब्ध आहे त्यामुळे मराठी माणसे संपुर्ण मराठीतुन संगणकावर काम्करु शकतात. पूर्वी इंग्रजी येणारेच त्यावर हक्क दाखवायचे भाषा निवडीच्या स्वातंत्र्यामुळे घराघ्ररातुन लहान मोठ्यांचा ,वृद्धांचा संगणक सोबती झाला आहे. काही ठिकाणी तर इंग्रजीतून टाइप केल्यावर ते आपोआप मराठीत बदलते ही किमया लोकसत्ता वर्तमान पत्राने वाचकांना मिळ्वून दिलेली आहे . आपली प्रतिकिया आपण मराठी शब्द इंग्रजीत लिहावीत ती मराठीत बदलतात. हा बदल तर क्रांती घडवतो आहे. असा हा संगणक लहान थोराचा खर्या अर्थाने सोबती, मित्र्बनला आहे. मानवाची विचारश्क्ती  इतकी भन्नाट आहे की अजुनही भरपुर बदल संगणकात सतत होतच रहातील यात शंकाच नाही.