इंटरनेट 
Internet


आपण आपल्या रोजच्या कामांसाठी कॉम्प्युटर वापरत असतो. तो वापरतांना आपल्याला काही गमतीशीर अनुभव येतात. तर काही चक्रावून टाकणारे अनुभव येतात. हे विचार करणारे यंत्र कधीकधी असा काही विचार करते की, प्रोग्रॅमर्स देखील चक्रावून जातात

                   कॉम्युअर  टर इंटरनेटचा प्रसार घराघरांत झाल्यारपासून -याच गोष्टीग करण्या ची पूर्वापार पद्धत बदलून गेली आहे. म्होणजे आता तुम्हारला घरातील मोबाईल, गॅस, वीज ही सर्व बिले भरण्यापसाठी चेक खरडावे लागत नाही.रेल्वेत/विमानाची तिकिटेच नाही तर आता सिनेमा/नाटकाची तिकिटे देखील इंटरनेटचा वापर करून काढता येऊ लागली आहेत. आपल्याु आवडत्याि लेखकाचे पुस्तेक इंटरनेटवरून घेणा-यांची संख्याल गेल्याे  काही महिन्यांटत लक्षणीयरित्याव वाढली आहे.

                   सध्याचा युवक टेक्नोवसॅव्ही झाला असून त्यात इंटरनेटचा वापर करण्याची क्रेझ वाढली आहे. यातील इंटरनेटचा वापर करणारा विशिष्ट वर्ग असून तो त्याचा फायदा करमणुकीऐवजी अभ्यासासाठीच जास्त करीत असल्याचे दिसते. -मेलपासून फेसबुक आणि ट्विटरवर अनेकांचे अकाउंट् असले तरी काही युवकांना गुगलवर जाऊन नवे अभ्यासक्रम आणि नोकरीच्या संधी शोधण्यात जास्त इंटरेस्ट आहे.

                      लहान वयात मुलांना इंटरनेट हाताळू देणं हे हल्ली एक फॅड झालंय. आजच्या बदलत्या युगात मुलांना इंटरनेट आलंच पाहिजे ( त्यात काय यायचं आहे? )  पण हा पालकांचा एक अट्टाहास असतो. मग मुलांना सातवी आठवी मधेच नेट वापरण्यासाठी परवानगी दिली जाते. बरेचदा   जर मुलगा इंटरेस्टेड नसेल तरीही नेट  वापरण्यासाठी एनकरेज केले जाते.

                     १८ वर्ष वय असे पर्यंत मुलाचे गुगल मधे किंवा याहू मधे अकाउंट उघडता येत नाही. मग आई वडीलच स्वतः खोटं वय घालुन  मुलाचा मेल अकाउंट उघडुन देतात बरेचदा. या खोटे पणाची काही आवश्यकता आहे का? मुलांना नेट वर जाउ द्यायचं, मेल अकाउंट उघडून द्यायचेमग मुलाने सगळ्यांसमोर आपला मेल पत्ता दिला की कौतुकाने त्याची पाठ थोपटायची- आमचाबाळूकिनाई खुपच फास्ट आहे, त्याला इंटरनेट सगळं कळतं.. असंही म्हणणारे पालक मला भेटले आहेत.

                       १३- १४ वर्षांची मुलं ऑर्कुट ,फेस बुक वगैरे सोशल साईट्स वर रजिस्टर करतात . कितपत योग्य वाटतं हे? प्रत्येक लॅप टॉप ला कॅमेरा असतोच, थोडं स्पष्टच लिहितोय,   कॅमेरा सुरु करून स्ट्रिपिंग करणे आणि सायबर सेक्स चे अट्रॅक्शन मुलांना ऍडीक्ट बनवते इंटरनेटचे . इंटरनेट जंकी! दुर्दैवाने ही गोष्ट घरच्या लोकांच्या लक्षात येत नाही- आणि जेंव्हा येते तेंव्हा वेळ गेलेली असते .ही काल्पनिक गोष्ट नाही, कृपया नोंद घ्या- माझ्या परिचितांच्या मुलाच्या बाबतीत झालंय हे, आणि म्हणूनच हे पोस्ट लिहायला घेतलंय .बरेच पालक हे मुलांना इंटरनेटची सवय (?) व्हावी म्हणून ऑनलाइन खेळ खेळू देतात. त्याच सोबत कधी मुलगा खेळणं बंद करुन चॅटींग आणि सोशल साईट्सच्या आहारी जातो हे घरच्यांच्या लक्षात पण येत नाही.या वयात लागलेली इंटरनेटची सवय ही नंतर सुटणे अवघड जाते. मी पाहिले आहे, बरेच लोकं तर ट्विटींग वगैरे मधे इतके गुंतलेले असतात की जर कॉम्प्युटर वर नसतील तर ते सेल फोन वरुन पण ट्विट करतात.  बरं ते असू द्या, इंटरनेट मुलांच्या रोगामधे कधी परावर्तीत  झालाय  हे पण पालकांच्या लक्षात येत नाही.

                     'इंटरनेटमुळे आज जरी जग जवळ आलेले असले तरी सायबर क्राईमच्या रुपातील त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेटचा वापर जबाबदारीने करायला हवा. सायबर क्राईमचे वाढते प्रमाण आणि विद्यार्थ्यांकडून सातत्याने होणारा इंटरनेटचा वापर या गोष्टी लक्षात घेऊन शाळेमार्फत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात यावे.

इंटरनेटचे फायदे आणि त्याचे दुष्परिणाम याची माहिती देताना इंटरनेटचा वापर करताना नकळतपणे होणाऱ्या चुकांमुळे सायबर क्राईमला कशी संधी मिळते याचीही माहिती अॅड.गोरवाडकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांमध्ये सोशल नेटवर्कींगची मोठ्या प्रमाणावर क्रेझ असल्याने सोशल नेटवर्कींग करताना आपल्या पर्सनल अकाऊंटची सुरक्षितता, सेटींग कसे असावे याबाबतही माहित असणे आवश्यक आहे.  इंटरनेट बँकींगचे प्रमाणही वाढत असल्याने सायबर क्राईमचा फटका नेट बँकींगला कसा बसू शकतो हे त्यांन उदाहरणांसह सांगितले पाहिजे. डेबिट क्रेडिट कार्डचा वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हेही माहित असणे आवश्यक आहे