आंबेडकर जयंती
Ambedkar Jayanti
बाबासाहेब
आंबेडकर हे एक थोर
समाजसुधारक होते त्याच बरोबर ते एक नेते,
अर्थतज्ज्ञ, आणि उत्कृष्ट कायदेपंडित होते. बाबासाहेब आंबेडकर सदैव दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना समाजामध्ये समान न्याय आणि वागणूक मिळवून देण्यासाठी झटत राहिले. त्यांचे संपूर्ण आयुष्य हा जातीय भेदभाव
आणि अस्पृश्यतेविरुद्धचा लढाच म्हणावं लागेल.
बाबासाहेब
आंबेडकर यांचे बालपण
बाबासाहेब
आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१
रोजी महू (जे आता मध्यप्रदेश
मध्ये आहे) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म एका गरीब दलित कुटुंबात झाला होता. त्यावेळी दलितांना समाजामध्ये अमानुष वागणूक मिळत असे व खूप भेदभाव
केला जाई. दलित मुलांना शाळेत प्रवेश होते पण त्यांना वेगळे
बसवण्यात येई आणि त्याचबरोबर त्यांना बसण्यासाठी घरून स्वतःचे गोणपाट आणावे लागत असे. त्यांना पाण्याच्या भांड्यांना हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेतील शिपाई उंचावरून त्यांच्या हातावर पाणी ओतायचे. आणि जेव्हा योनी शिपाई नसेल तेव्हा त्यांना तसेच तहानलेले राहावे लागत असे. बाबासाहेब आंबेडकर अशाच विद्यार्थ्यांपैकी एक होते. त्यांनी
ह्या सर्व गोष्टींना तोंड देत आपले शिक्षण पूर्ण केले.
बाबासाहेब
आंबेडकर यांचे शिक्षण
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजातील
पहिले विद्यार्थी होते ज्यांनी एल्फिन्स्टन हायस्कुल मध्ये १८९७ मध्ये प्रवेश घेतला होता. त्यांनी १९०७ मध्ये मॅट्रिक ची परीक्षा पास
केली आणि मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९१२ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पदवी मिळवली आणि जून १९१५ मध्ये एम. ए. ची परीक्षा
उत्तीर्ण झाले. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये पी. एच. डी. मिळवली. त्यावेळी भारतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमेव
व्यक्ती होते ज्यांच्याकडे इतकी उच्च पदवी होती. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि
कोलंबिया युनिव्हर्सिटी मधूनही पदव्या संपादन केल्या होत्या. त्यांनी एक शिक्षक आणि
अकाउंटंट चे काम सुरु
केले आणि सोबत स्वतःचा व्यवसाय हि सुरु केला.
पण जेव्हा त्यांच्या ग्राहकांना समजले कि ते दलित
आहेत तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांचा व्यवसाय बंद झाला.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजकार्य
जेव्हा
दलितांची मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांना मदत करण्यासाठी उभे राहिले. त्यांनी दलितांचा विकास करण्यास आणि त्यांना समान हक्क आणि न्याय मिळवून देण्यास मदत केली. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. त्यांनी दलतांसाठी सार्वजनिक पाणपोई सुरु करण्यासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड मधील चवदार टाळ्याला सत्याग्रह जगप्रसिद्ध आहे. त्यांनी दलितांना मंदिरांमध्ये प्रवेश हि मिळवून दिला.
दलितांसाठी
लढण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा आर्थिक आणि सामाजिक कणा मजबूत करण्यासाठीही योगदान दिले. अर्थशास्त्र आणि राजनैतिक क्षेत्रातही त्यांनी खूप मोलाचे काम केले. भारतीय संविधानाचे ते शिल्पकार होते.
त्यांनी महिलांचा आणि मजुरांच्या हक्कांसाठी लढा दिला. मुंबई मधील गव्हर्नमेंट कायदा कॉलेज चे ते २
वर्ष प्रिन्सिपॉल हि होते. देशातील
अस्पृश्यता दूर करण्यासाठी आणि दलितांना समान न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी शेवटपर्यंत लढा दिला.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचा
मृत्यू
६
डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला. हा दिवस महापरिनिर्वाण
दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या मृत्यूनंतर १९९० मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या सन्मानार्थ अनेक इमारती, क्रीडांगणे, महाविद्यालये, आणि सार्वजनिक ठिकाण त्यांचे नाव देण्यात आले.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके
डॉ.
बबसाईहब आंबेडकर यांनी अनेक पुस्तके लिहिली. काही पुस्तके अर्धवट हि राहिली होती
जी त्यांच्या मृत्युंनतर प्रकाशित करण्यात आली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.
द
बुद्ध अँड हिस धम्म (The Buddha and his
Dhamma)
पाकिस्तान
ऑर द पार्टीशन ऑफ
इंडिया (Pakistan or
the Partition of India)
द
अनटचेबल्स- व्हू वेर दे अँड व्हाय
दे बिकेम अनटचेबल्स? (The
Untouchables Who Were They And Why They Became Untouchables?)
एसेज
ऑन अनटचेबल्स अँड अनटचबिलिटी (Essays on
Untouchables and Untouchability)
रिडल्स
इन हिंदुइसम (Riddles in
Hinduism)
व्हॉट
काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द
अनटचेबल्स (What Congress
and Gandhi have done to the Untouchables)
कास्ट्स
इन इंडिया : देअर मेकॅनिसम, जेनेसिस अँड डेव्हलोपमेंट (Castes in India: Their Mechanism, Genesis
and Development)
निष्कर्ष
(Conclusion)
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर
कायदेपंडित, तत्वज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी दलितांच्या हक्कासाठी आणि त्यांना समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय संविधानाचे ते शिल्पकार आहेत.
भारताला सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
0 Comments