डॉक्टर सलीम अली
Dr. Saleem Ali
केवळ पशु-पक्षी पाळणारे अनेक लोग आपल्याला आढळतात, पण प्रत्येक पक्ष्याची व प्राण्याची एक वैशिष्टपूर्ण जीवनकहाणी आहे. ती जीवनकहाणी जाणणारे सलीम अली हे असेच एक भारतीय पक्षी- विज्ञानवेते म्हणून जगात प्रसिद्ध आहेत.
१२ नोव्हेंबर, १८९६ साली सलीम अलींचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांना रानावनात भटकण्याची व पशुपक्ष्यांचे जीवन पाहण्याची चटक लागली. हीच त्यांची जन्मजात आवड ठरली. निसर्गाच्या रम्य मोकळ्या वातावरणात भटकतांना हे पक्षीजीवन न्याहाळण्याची त्यांची जिज्ञासा वृत्ती बळावली. त्यामुळे शालेय शिक्षणाऐवजी बिनभिंतीच्या शाळेतच ते शिकू लागले. वडलांनी त्यांचा थोर मुलगा जो म्यानमार-ब्रम्हदेशात व्यापार करीत होता, त्याच्या मदतीसाठी सलीम यांना पाठविले. पण सलीमच्या मनात पक्षी बसले नव्हते.
ब्रम्हदेशातून परतल्यानंतर सलीम या पक्षीजीवनाच्याच अभ्यासात दंग झाले. फासेपारध्याकडून व स्वतः निरीक्षण करून ते त्यात तज्ञ झाले. नंतर मुंबईच्या नॉचरल हिस्टरी संस्थेत गाईड म्हणून काम करू लागले. पुढे त्याच विषयाचे अधिक अध्ययन करण्यासाठी ते जर्मनीत गेले. ते भारतात परत आले तर त्यांना कुठेही नौकरी मिळाली नाही.
बॉम्बेपोर्टनजीक एका घरात सलीम अली राहू लागले. त्यांनी विणकर पक्ष्याच्या राहणीचा अभ्यास सुरु केला व १९३० साली त्या पक्ष्याच्या जीवनावरच एक शोधप्रबंध त्यांनी प्रकाशित केला व जग त्यांना पक्षितज्ञ म्हणून ओळखु लागले.
त्यांनी केवळ याच पक्षिजीवनाचा अभ्यास न करता जगातील अनेक पक्ष्यांचा जीवनाचा अभ्यास सुरु केला. त्यामुळे त्यांना भारत सरकारकडून व अन्य संस्थांकडून अनेक सम्मान प्राप्त झाले. ते राज्यसभेचे सदस्यही बनले.
‘भारतातील पक्षी’ हे पुस्तक त्यांनी १९४१ साली लिहिले. ‘पाकिस्तान व भारतातील पक्षीजीवन’ या विषयावर १९४८ साली दुसरे पुस्तक लिहिले. ही दोन्ही उत्कष्ट पुस्तके पक्षीजीवनाविषयी लोकोत्तर माहिती देणारी आहेत. त्यांनी आपले आत्मचरित्रही लिहिले आहे. एकाच विषयाचा ध्यास ठेऊन जीवनभर त्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्याने किती दिगंत कीर्ती मिळते,याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
२० जून १९८७ त्यांचे मुंबईत निधन झाले.
0 Comments