साक्षरतेचे महत्व 
Importance of Education



                भारतात, ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनच्याअनुसार जर एखादी व्यक्ती आपले नाव लिहु आणि वाचु शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजले जाते. वास्तवीक १९८८ मध्येराष्ट्रीय साक्षरता मिशनचीसुरुवात झाली होती ती यासाठी की १५ ते ५५ वयोगटातील ७५% लोकांना २००७ पर्यंत कामापुरते साक्षर बनवण्यात यावे आणि त्यायोगे वेळोवेळी केल्या गेलेल्या जनगणनेत साक्षर लोकांची टक्केवारी सुध्दा वाढली. पण आजच्या जगात केवळ एवढ्याच ज्ञानावर एखादी व्यक्ती साक्षर संबोधणे चुकीचे आहे.

                 पुर्वीच्या काळी निरक्षर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होतं होती. मुख्यतः सावकारांकडुन. अश्या लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेउन त्यांच्याकडुन अंगठ्यांचे ठसे घेउन मोठ्याप्रमाणात जमीनी, आर्थीक मालमत्ता लाटण्यात आल्या. पुढे सरकारकडुन सावकारांवर बंधंन आली आणि अश्याप्रकारांना आळा बसला. असे असले तरी निरक्षरतेमुळे अश्या समाजाची वाढच खुंटल्यासारखे झाले. व्यवहारी जगात प्रगतीचे अनेक मार्ग उघडे असतानाही असा निरक्षर समाज पारंपारीक व्यवहारांमध्येच गुंतुन पडला त्यामुळे त्यांचे आर्थीक प्रगतीचे मार्ग खुंटले. बालमजुरी, अल्पवयीन गुन्हेगारी, रस्त्यांवर भिक-मागणारे अनेक लहान-लहान मुले यांच्या प्रमाणात निरक्षरतेमुळे वाढ झाली. “एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं, सुशिक्षित होतं.” असे ज्योतीबा फुले म्हणाले होते. परंतु काळाच्या ओघात त्यांचे विचारही तितकेसे तग धरु शकले नाहीत. आजही निरक्षरतेमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. निरक्षर पालकांमुळे कुटुंब कल्याण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंधश्रध्दा अश्या अनेक गोष्टी वाढत जातात ज्या इतर समाजाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत देश्याच्या शक्तीला पोखरुन काढत आहेत.

                  लहान मुलांच्या अंगी प्रचंड चैतंन्य असते. त्याला साक्षरतेने योग्य आकार दिला तर हीच मुले पुढे स्वतःचे आणि पर्यायाने देश्याचे भवित्यव्य उज्वल करतील. ‘शेतकर्य़ांच्या आत्महत्याचर्चेचा विषय ठरत असतानाच, एखादा शिकलेला साक्षर शेतकरी आपल्या हुशारीचा, ज्ञानाचा वापर करुन पर्यायी मार्ग शोधुन काढतो आणि स्वतःच्या पायावर भक्कम उभा राहीलेला दिसुन येतो. एखादे शिकलेले कुटुंब आपल्या आजारी पाल्याला अंधश्रध्देच्या आहारी जाऊन एखाद्या भोंदु-बाबाकडे न्हेता गावातील डॉक्टरांकडे घेउन जाते आणि वेळीच औषधं मिळाल्याने त्याचा जिव वाचवताना दिसते. वर्षानुवर्ष दारीद्रात अडकलेल्या कुटुंबातील एखादी मुलगी शिकुन मोठेपणी स्वबळावर उभी रहातेच, परंतु पर्यायाने तिचे कुटुंबही दारीद्रातुन बाहेर पडते. असे एक ना अनेक उदाहरणं आपल्या आजुबाजुला घडताना पहातो. हे सर्व साकार होते ते केवळ आणि केवळ साक्षरतेमुळेच.

                 आज सरकारने केवळ मुलांसाठीच नाही तर महिला आणि जेष्ठांसाठीही साक्षरता मोहीम हाती घेतली आहे. गावोगावी शाळा उभ्या रहात आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी फि-माफीच्या योजन्या राबवल्या जात आहेत. घरची परिस्थीती बेताची असल्याने दिवसभर कष्ट करुन शिकणासाठी रात्रीच्या शाळासुध्दा सुरु केल्या आहेत,

असं म्हणतातवाचाल तर वाचाल”. निरक्षरता दुर करण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर तुमच्या आमच्यासारख्या साक्षरांची सुध्दा आहे. सरकारने ह्या साक्षरतेच्या अभियानात एक पाऊल पुढे टाकले आहे, निरक्षर समाजाने दोन पावलं पुढे टाकण्याची गरज आहेच, पण त्याचबरोबर गरज आहे ती आपल्या सारख्यांनी आजुबाजुला वावरणाऱ्या निरक्षर समाजाला साक्षरतेचे महत्व पटवुन देण्याची, त्यांना साक्षर बनवण्याची. निरक्षरता हा राज्यांच्या प्रगतीतील अडथळा असून तो दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद सरकारने सर्वांसाठी शिक्षणाचा कायदा केला आहे. त्याची काटेकोर अमलबजावणी करून भविष्यात राज्याला शंभर टक्के साक्षर करू अशी शपथ घेऊ.