माझा आवडता पक्षी कावळा
My favorite Bird Crow

                  माझा आवडता पक्षी कावळा आहे. कावळ्याचा रंग हा काळा असतो. पण त्या बद्दल कावळ्याला कधीच न्यूनगंड येत नाही आणि कधीच तो आपला रंग बदलण्यासाठी कुठला cream वापरत नाही. हा कावळ्याचा confidence मला फार आवडतो. कावळा काळा आहे म्हणून तो फारश्या लोकांना आवडत नाही. पण त्यामुळे कावळ्याचा काहीच बिघडत नाही. तो त्याच्या मनाप्रमाणे कुठे हि उंच फांदीवर अथवा उंच इमारतीवत बसतो आणि कुठल्याही luxary कार वर मलमूत्र करू शकतो. आपण काळे आहोत म्हणू कसा shit करू .. हा प्रश्न त्याला पडत नाही. लाजणे हा आणखी एक त्याचा गुणधर्म जो त्याला याकामी फार उपयोगी पडतो.

                 कावळा हा सर्वात यशस्वी प्राणी आहे. तो भारत, चीन , अमेरिका , आफ्रिका एवढा काय तर antartika वर हि सापडतो. तो गरम, थंड कोणत्याही वातावरणात adjust करू शकतो. आणि काहीही शाकाहारी, मांसाहारी खावून जगू शकतो.यावरून तो phisycally बराच fit असला पाहिजे आणि त्याला पोटाच्या तक्रारी आणि सर्दी खोकल्या सारखे शुल्लक आजार होत नसावेत. कावळ्याला bird flue होत नाही कारण news मध्ये तरी तसे कधी ऐकले नाही आहे.

                त्याचा नैसर्गिक शत्रू कोणाच नाही आहे. त्याचे मांस बहुदा चांगले लागत नसावे, त्यामुळे मनुष्यांकडून त्याला फारसा धोका नाही आहे. कोणत्याही परीस्थीतीत स्वताला मोल्ड करणे हा त्याचा आणखी एक गुण. जिकडे जातो तिकडचा होवून जातो. कावळ्याची प्रजनन क्षमता हि खूपच चांगली असावी, कारण एका झाडावर कायम १० तरी कावळे असतात.

                कावळा हा हुशार प्राणी आहे हे काही मराठी गोष्टीतून लहानपणी शिकलो आहे. कावळा भांड्यातला खाली गेले पाणी खडे टाकून काढतो आणि पितो. कावळा हा एकाक्ष आहे . म्हणजेच एकाच डोळ्यांनी पाहू शकतो. एकाक्ष प्राणी हे खूप हुशार असतात असा एक scientific शोध आहे. महाभारतातले शकुनी मामा हे हि एकाक्ष होते. त्याचप्रमाणे कावळा हा सुद्धा हुशार असला पाहिजे. जे शकुनी मामा नि लढता जिंकले होते ते दुर्योधनाने लढाई करूनही हरवले.. असो..

                 कावळ्याला आधुनिक जगतातील corporate boss ची उपमा देण्यात येते. कारण corporate boss हे सर्वात उंच फांदीवर बसून कावल्याप्रमाणे खालच्या लोकांवर shit करत असतात, आणि खालचे लोक फक्त वर पाहू शकत असतात आणि काहीच करू शकत नाहीत. कावळा हा असाच झाडावरच्या सर्वात उंच फांदीवर बसणारा पक्षी आहे. तो मनसोक्त पणे इतरांवर shit करू शकतो. जरी तो काळा असला तरी त्याची shit पांढरीच असते हे उलाघाडणारे कोडे आहे. corporate boss हि असेच मानाने काळे असून पांढरी shit कसे करतात माहित नाही.

                कावळा हा निर्लज्ज प्राणी आहे. त्यामुळे कलियुगात तो यशस्वी होवू शकला. त्याला किती हि हाकलले तरी तो त्याच झाडाच्या त्याच फांदीवर निर्लज्ज पाने बसतो. आणि त्याला खुन्नस देणार्याच्या कार वर चुकता shit करतो. जरी आपण ते झाड कापले तरीही त्याला त्याचा काहीच तोटा होत नाही. तो विजेच्या तारेवर किवा उंच बिल्डिंग च्या कठड्यावर बसून सर्वात luxary कार वरच shit करतो. त्यामुळे नुकसान luxary कार चेच आणि कावळ्याला खुन्नस देणार्याचेच होते.

                  कावळा हा प्राणी माणसाच्या दशक्रिया विधी दिवशी उपयोगी पडतो. पिंडाला कावळा शिवला कि माणसाचा आत्मा मुक्त होतो असे म्हणतात. त्यामुळे आयुष्यातून मुक्ती मिळवायची असेल तर कावल्याशिवाय पर्याय नाही. ज्या घाटावर जास्त कावळे असतात शक्यतो तिथेच पिंड दान करावे. त्यामुळे बाकीचे पक्षी हे जिवंतपणी उपयोगी पडत असले तरी मेल्यावर कावळाच मदती साठी येतो. या मूळे माझा कावळ्याच्या विषयी आदर आणखीनच वाढतो.

                   कावळ्याच्या घरट्यात कोकीळा अंडी घालते असे म्हणतात आणि कावळीन ती अंडी उबवते आणि मग त्या पिलाला मोठी करते असे म्हणतात. त्यावरून कावळे हि कोकीळेसाठी काहीही करू शकतात हे सिद्ध होते. आपल्या प्रीयासिसाठी आपल्या बायकोला हि कावळा गंडवू शकतो, यावरून कावळा हा बायकोला manage करण्यात पटाईत असला पाहिजे. या management skills मूळे तो थेट corporate boss बनतो. कावळ्याचा divorse झालेला अजून तरी ऐकिवात नाही.

                  अश्या पद्धतीने मी कावळ्यावर अजून १०० ओळी लिहू शकतो. परंतु हा २५ line चा निबंध असल्याने मी आवरते घेतो.
तात्पर्य असे कि, कलियुगात राहायचे असेल तर कावळा बनून राहा. कोणत्याही मौसमात टिकून राहा (phisically fit ), वारा येईल त्या दिशेन उडा. स्वत बद्दल confidence बाळगा. आपले मांस दुसर्यांना कडू लागेल याची काळजी घ्या.(म्हणजे कोण शिकार करणार नाही). डोक्याचा वापर करून समस्या सोडवा. झाडाची (कंपनीत) सर्वात उंच position मिळवा म्हणजे आपल्यावर कोणीच shit करू शकणार नाही. खुन्नस देणार्याच्या वर shit करून त्याला हैराण करा. कोणी कितीही दगड मारले तरी आपली फांदी ( position ) सोडू नका. दगड वाचवून परत तिथेच बसा. कुणीही झाड कापले तरी..(कंपनीने fire केले किवा company बंद पडली ) तर दुसर्या झाडावर किवा उंच इमारतीवर उडून बसा. उडण्याची एवढी क्षमता (technical स्किल्स) मिळवा कि आपण कुठेही उडू शकू.

एवढे सगळे करत असतानाच बायकोला हि manage करा. आणि खरच एखाद्या चांगल्या माणसाला मुक्ती मिळण्यासाठी मदत करा.