माझा आवडता प्राणी वाघ
My Favourite Animal Tiger

                 वाघ माझा आवडता प्राणी आहे. वाघाचे शरीर पट्टेरी असते. वाघाच्या शरीरावर जरी पट्टे असले तरी तो पट्टा घालत नाही कारण वाघ हा एक प्राणी आहे म्हणून तो  पॅंन्ट घालत नाही. कोणतेच प्राणी  पॅंन्ट घालत नाही.  फक्त माणूस पॅंन्ट घालतो.  पॅंन्ट लूझ असली तरच पट्टा घालावा लागतो.  नाहीतर पट्टयाची काही गरज नसते. लहानपणी मी परीक्षेत नापास झालो की बाबा मला पट्टयाने मर मरे पर्यंत मारायचे.  पण आता मला ते मारत नाही.  धरावी मध्ये चामड्याचे पट्टे स्वस्त आणि मस्त मिळतात.  पण मला चामड्याच्या पट्ट्या पेक्षा वाघ चा जास्त आवडतो.

              वाघाला चार पाय असतात, हाथ एक पण नसतो.  तरीही त्याला कुणी अपंग असे म्हणत नाही.

                वाघाला इंग्लिश मध्ये टायगर असे म्हणतात.  माझ्या मित्राच्या कुत्र्याचे नाव टायगर आहे.  पण माझा मित्राचा कुत्रा वाघ नाही.  कारण त्याच्या अंगावर पट्टे नाहीत आणि त्याला वाघ सारखी डरकाळी पण फोडता येत नाही.  तो एक सारखा भुंकत असतो. भो भोभो भो भो  हि त्याची भुंकण्याची स्टाईल आहे .

                   आमच्या शेजारी रमेश अंकल राहतात. त्यांचे पूर्ण नाव रमेश सीताराम वाघ . मी आणि बंटी त्यांना प्रेमाने वाघ काका ……वाघ काका असे म्हणतो.  सोसायटी मीटिंग मध्ये वाघ काका नसले की सर्वजन बोलतात  अरे कुणी त्या वाघाला बोलवा “,  पण जंगलात असताना कुणीच असे बोलत नाही कि  अरे कुणी त्या वाघाला बोलवा “.  कारण खरा वाघ दिसतो तेव्हा सगळ्यांची हवा टाईट होते.  खर्या वाघाला सगळे जन घाबरतात पण वाघ काकांना कोणीच घाबरत नाही कारण ते एकदम साधे आहेत,  आय जस्ट लव वाघ काका……

                    वाघ काका प्युर शाकाहारी आहेत.  पण ओरीजन वाघ मात्र नॉन शाकाहारी असतो. मला नॉन वेज मध्ये चिकन टिक्का,  चिकन लॉल्लीपोप,  चिकन फ्राईड, चिकन फ्राईड राईस हे सर्व आयटम आवडतात.  पण वाघाला चिकन चे आयटम खायला भेट नाही कारण तो जंगलात राहतो.   जंगलात चिकन भेटत नाही म्हणून वाघ दुसर्या डिशेश वर ताव मारतो.  शहरातले डुक्कर जेव्हा जंगलात जातात  आणि जंगलातले रान खातात तेव्हा ते खर्या अर्थाने रानडुक्कर होतात. बंटी खेळून घरी आला की त्याचे कपडे खराब होतात तेव्हा त्याची आई त्याला बोलते  डुकरा कोणत्या गटारात लोळून आला “.

                 वाघ आपला राष्टीय प्राणी आहे.  काही लोक वाघाची शिकार करतात.  ते मला आवडता नाही.  आपण सर्वांनी मिळून वाघाला वाचवाले पाहिजे..