सरदार वल्लभ भाई पटेल 

Sardar Vallabh Bhai Patel


                ‘भारतीय पोलादी पुरुष’ म्हणून ज्यांची ख्याती अजरामर आहे असे थोर महात्मे ‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांना भारतीय नागरिक कधीही विसरणार नाही. सरदारांचा कणखरपणा धीटपणा हा त्यांचा वर्तनातूनच दिसून येत होता. एकदा त्यांच्या काखेत आलेल्या गळून चटका देण्याऱ्यास तप्त लाल सळ इने चटका देतांना वाईट वाटत होते. अशा प्रसंगी वल्लभभाईंनी स्वतः ती सळई घेऊन चटका दिला. अशा धिटाईतूनच ते पुढे शिक्षणात सुद्धा चमकले. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. ब्यरिस्टर झाले ख्यातनाम वकील म्हणून नाव कमावले.

                 महात्मा गांधीच्या प्रभावामुळे सरदार वल्लभभाई देशसेवेत रमू लागले. गुजरातमध्ये आलेल्या पुराच्या प्रसंगी त्यांनी लोकांना धीर दिला. पुढे नागपूरच्या सरकारच्या अवाजवी करासंबंधी आवाज उठविला. बार्डोलीच्या सत्याग्रहाच्या वेळी शेतकाऱ्यांवर बसविलेला जाचक शेतसारा त्यांनी शेतकऱ्यांच्या सहकार्यांतून मागे घेतला. त्यांना लोकांनी ‘सरदार’ ही पदवी बहाल केली. भारत स्वतंत्र झाल्यांनतर ते भारताचे गृहमंत्री झाले. स्वंस्थांन मंत्री म्हणून उत्कृष्ट प्रकारचे काम केले. संस्थानाने स्वंस्थांनांच्या विलीनिकरणाकरिता त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग केला. या पोलादी पुरुषाने १५ डिसेंबर १९५० रोजी मुंबई येथे जनाचा निरोप घेतला.