Hindi Essays, English Essays, Hindi Articles, Hindi Jokes, Hindi News, Hindi Nibandh, Hindi Letter Writing, Hindi Quotes, Hindi Biographies

Marathi Essay on "The era of Competition", " सपधेर्चे युग" for Kids and Students.


सपधेर्चे युग
The era of Competition

              आज हे एकविसावे युग स्पर्धेचे युग म्हणूनच ओळखले जाते. या धक्काबुक्कीच्या जीवनात आणि या सिमेंटच्या जंगलात लोक अडकलेले आहेत. विज्ञानाच्या वाढत्या सुविधांमुळे माणसाला साध्या साध्या चांगल्या गोष्टींचा विसर पडत चालला आहे. आता बघा ना. असे म्हणतात की पूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता. म्हणजे त्या काळी आपला देश किती असमृध्द संपन्न आणि श्रीमंत होता याची फक्त कल्पनाच केलेली बरी.

                पण जसजसा काळ पुढेपुढे जाऊ लागला तसतसे विज्ञान अधिक प्रगत होऊ लागले. पैशाच्या हव्यासापायी खेड्यातील लोकांचे लोंढेच्या लोंढे शहराकडे जाऊ लागले. मातीच्या घराऐवजी सिमेंट- कॉंक्रेटची जंगलेच्या जंगले निर्माण होऊ लागली.

                त्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होऊ लागली आणि त्यामुळे आज त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. झाडे नसतील तर आपले जीवन अशक्य आहे. ती नसतील तर जमीनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते. धूपेमुळे माती वाहून जाऊन नदी मोठमोठी धरणे, तलाव मातीने भरतात शासनाचा लाखोंचा खर्च वाया जाऊन त्यापासून लोकांना काहीही फायदा मिळणार नाही. सध्या प्राणवायूसाठी दवाखान्यात पैसे खर्च करावे लागतात. पण त्याचाऐवजी मोकळ्या हवेत फिरुन अनेक आजार बरे करता येतात.

                 आज मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड चालू आहे आणि होतही राहिल....पण त्यामागचे परिणाम जाणून घेता मानवाने हे कृत्य केले आहे. पर्यावरणाचे चक्र यामुळेच बिघडले आहे. त्यामुळे महापूर, रोगराई, दुष्काळ हे दुष्परिणाम जाणवतात. मला पूर्ण जाणीव आहे की मीच उद्याचा सुजाण नागरिक आहे. त्यामुळे सर्व काही माझ्याच हातात आहे. आज शेतकरी आधुनिकीकरणाकडे वळत आहे. याचे उदाहरण म्हणजेच पूर्वीच्या शेतकऱ्याला गांडूळ खत, शेण खत . खताशिवाय दुसरे काहीच माहित नव्हते. या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा चांगला भाव मिळत नाही. आता रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जमिनी नापीक होतात.

                 आज सामान्य माणसाचे ही स्वप्न आहे की, माझा एक मोठा बंगला असावा. त्याच्यापुढे अलिशान गाडी असावी. यापायी त्याने स्वत:चे शेत विकले. खेड्यातले आपले ते दमदार घर विकले, शहरात खुरुड्यात येऊन तो राहिला. याचाच परिणाम होऊन अन्नधान्यांची टंचाई भासू लागली आणि या पर्यावरणाचे संतुलनच बिघडून गेले ही काळी पावसाच्या थेंबाथेंबासाठी चातक या पक्षासारखी वाट बघत राहिली. अनेक लोकांचे संसार दाबून श्रीमंताच्या इमारती उभ्या राहतात. पण त्यासाठी लागणारे सिमेंट ही मातीपासूनच बनवले जाते. आज आपल्या देशाला लोकसंख्येचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. आपल्या देशाची लोकसंख्या आज १०० कोटीच्याही पुढे गेली आहे. या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा त्यांच्या जागेचा, अन्नधान्याचा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे पुन्हा वृक्षातोड करावी लागल्यामुळे तेच प्रश्न पुन्हा उद्भवतात. म्हणून मुळातच लोकसंख्या वाढू देणे हे गरजेचे आहे. ही वसुंधरा आज या बोझाने वाकत आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरीया तुकारामांच्या वजनाची खरी गरज आहे.

                   आजच्या लोकांनी सरळ, साध्या जीवनाला फॅशनेबल केलं आहे असं म्हंटल तरी काही वावगं ठरणार नाही. ते वडाचं झाड कुंडीत लावतात. पुर्वीची माणसे रानातून आणलेल्या झाडपाल्यावर आपला आजार बरा करत होती. पण आताची माणसं पोटात दुखायला लागलं की दवाखान्यात जातात पण त्याऐवजी लिंबू- सोडा खाल्ला असता तर पोटदुखी थांबली असती. पण त्यासाठी प्रत्येकाला लिंबू आणावा लागतो. पण अंगणात लिंबवाचे झाड लावले तरच आपली भारतमाता सुजलाम- सुफलाम होऊन जाईल.


Post a Comment

0 Comments