कोणत्याही गोष्टीचा आति लोभ करू नये 
Don't be greedy for anything


            एक गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे.त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर  पाणी पिऊन जगायचं.भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता.


       देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला 'तुला काय हवे ते मग'भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या .देव म्हणाला 'मोहरा कशात घेणार?"  भिकाऱ्याने झोळी पुढे केली.मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव  म्हणाला'मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल.

 

       पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल .भिकाऱ्याने जेव्हा अट अमान्य केली .देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू  लागला  हळूहळू   झोळी भारत आली पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना. 

        

       मोहरांच्या वजनाने झोळी फटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता .शेवटी जे व्हायचे तेच झाले.त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते.


         त्याच्याबरोबर देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरात नाही.आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहतो.


  तात्पर्य  - कोणत्याही गोष्टीचा आति लोभ करू नये