वाचाल तर वाचाल
Vachal tar Vachal
'वाचाल तर वाचाल' ही म्हण आजच्या
घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो.आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान
ही त्याची फार मोठी शक्ती आहे. याशक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर
होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धात्याचा प्रभाव पडतो. मागल्या
पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहेअशी तक्रार सर्वच थरातून वाढले
आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्तरेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर,
चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची
साधने इतकी जास्त वाढलीआहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच
मिळेनासा झाला आहे.
अलीकडच्या काळात आपल्या
मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्याघडीला जगातील कानाकोपर्याात
घडणार्यात घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्यापिढीपाशी ही अद्ययावत
साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवीत असत. परंतु
जुन्या पिढीमध्ये शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नव्हता.जवळ जवळ 80 टक्याच्या वर जनता निरक्षरच होती त्यामुळे
वाचनाचा मक्ता काहीसुधारलेल्या सुशीक्षित समाजापुरताच सिमीत होता आता शिक्षण सर्व
सामान्यापर्यंत पहोचलेआहे परंतु इतर प्रसार माध्यमांच्या बाहुल्यामुळे प्रत्यक्ष
वाचन आणि तेही कसदार वाचननिश्चितच कमी झालेले आहे.
भारतीय परंपरेत, आपल्या प्राचीन संस्कृतीत ज्ञानाचा अमर्याद
खजिना निरनिराळ्या पोथ्या,पुराणे, धार्मिक ग्रंथ यात साठविलेला आहे. पूर्वीच्या
पिढीत मुठभर शास्त्री-पंडितांच्या हातीहे ज्ञानभांडार होते. ब्रिटिश काळांत
इंग्रजी शिक्षणाच्या संस्कारतून प्रबोधन काळाची महूर्तमेढरोवली गेली. नवशिक्षणातून
ज्ञानाची नवीन खिडकी उघडली गेली. आणि पाश्चात्य,तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांची ओळख आम्हाला झाली.
त्यातूनविचारांची नवी दिशा आम्हाला प्राप्त झाली. त्याचा आपल्या जीवन शैलीवर
प्रभाव पडूलागला. पाश्चात्याचे अनुकरण करण्याची वृत्ती बळावली. यांच्यातील शिस्त,
प्रामाणिकपणा,चिकाटी आणि कर्तव्यत्परता इत्यादी गुणांचा स्वीकार
करण्याऐवजी त्यांची बिनधास्त, स्वैरआणि बेपर्वा
वृत्ती आम्ही घेतली. संस्कारांची मातब्बरी आम्हाला वाटेनाशी झाली.अर्ध्या
हळकुंडाने पिवळे होऊन आम्ही त्यांच्या जीवनशैलीची भ्रष्ट नक्कल करू लागलो.त्यांतून
आपल्या संस्कृतीमधील काय मूल्यवान आहे याचे भान आम्ही हरवून बसलो वत्यांच्या
संस्कृतीतील मूल्यवान गोष्टी स्वीकारण्याचे आम्ही टाळू लागलो.
सध्याची अवस्था तर एक
प्रकारची कुंठावस्था आहे असे मला वाटते. लहानपणी जुन्यापिढीत मुलांच्या हातात
इसापनीती, साने गुरूजींच्या
संस्कारक्षम गोड गोष्टी, 'श्यामची आई'या सारखी पुस्तके असायची. आताची मुळे सलग पानभर
नाही लिहिलेले असेल तर तेसुद्धा वाचायची तसदी घेत नाही. चित्रांच्या मार्फत 2-2 ओळींची माहिती संकलित केलेलीकार्टून्स त्यांना
जास्त आवडतात, दीर्घ कथा,
लघु कादंबरी, मोठी वैचारिक पुस्तके, सुंदरकवितांचा संग्रह या गोष्टीय तर त्यांच्या आजुबाजुला
फिरकत सुद्धा नाही.
अलीकडे हा वाचन संस्कारच
घराघरातून हरवला आहे. अगदी बालवर्गापासून परीक्षा आणित्यात मिळणारी टक्केवारी
यालाच अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेपाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अन्य
वाचन करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृतीच नष्ट झाली आहे.पालकही याबाबत उदासीन झाले
आहेत. शाळा, परीक्षा, शिकवणी वर्ग आणि डॉक्टर किंवाइंजिनिअर बनण्याची
दुर्दम्य आकांक्षा त्यातून निर्माण होणारी जीवघेणी स्पर्धा, त्या स्पर्धेतटिकून राहण्यासाठी वाट्टेल त्या वैध/अवैध मार्गाचा
अवलंब या सर्व दुष्चक्रात आताचा पाल्यआणि पालक दोघेही अडकले आहेत त्यातून वेळ
काढून परीक्षा निरपेक्ष, निखळ आनंद
देणारेवाचन करण्यास त्यांना फुरसतच नाही.
वाचन समृद्ध असले
म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो,रसिकता वाढीस
लागते सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसर्याीच्या दु:खाची जाणीव,त्यांस आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी
मिळते. खर्याु अर्थाने मानुषतेचेमूल्य अंगी बाणते. सामाजिक जाणीव दृढ होते.
इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काहीकर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते.
माता, पिता, शेजारी, समाज आणि राष्ट्रापर्यंत आपलीकही बांधिलकी आहे याची जाणीव
जागृत राहते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत
अडकत नाही.ते विश्वात्मक होते. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या
अस्तित्वाचे मोल कितीअनमोल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही.
2 Comments
Bhai please give me short essay on vachal tar vachal
ReplyDeleteMohit
ReplyDelete