बेटी बचाओ, बेटी पढाओ 
Beti Bachao, Beti Padhao

                भारताला तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, साहित्य, राजनीती, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठा वारसा लाभला आहे. खूप अशा भारतीय महिला स्वातंत्र्य सेनानी, खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेविका, अभिनेत्री, आणि नेत्यांनी भारताचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आहे. राणी लक्ष्मीभाई, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, मदर तेरेसा,कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, साक्षी मलिक, पी व्ही सिंधू अशा काही इतिहासातील आणि अलीकडच्या काळातील कर्तबगार महिलांची नावे आहेत.

                   जीवन जगणे हा माणसाचा मूलभूत हक्क आहे आणि स्त्रीभ्रूण हत्या करून लोक तो हक्क क्रूरपणे हिसकावून घेत आहेत. ११ ऑक्टोबर ला पूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय बालिका शिशु दिवस (International Girl Child Day) साजरा केला जातो. ह्या दिवशी मुली आणि महिलांबद्दलच्या समस्या जसे कि लैंगिक भेदभाव, स्त्रीभ्रूण हत्या आणि शिक्षण, आरोग्य सेवा यांमध्येही सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांमद्धल जनजागृती केली जाते ह्या समस्यांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न केले जातात. ह्या दिवशी बालविवाह, महिलांवर होणारे अत्याचार ह्यांबद्दल ही जनजागृती केली जाते. अशा सर्व समस्यांशी दोन हात करण्यासाठी भारत सरकारनेबेटी बचाओ, बेटी पढाओहा अभियानाची सुरुवात केली आहे. मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा हा संदेश ह्या अभियानामार्फत दिला जात आहे. ह्या अभियानाला मराठी मध्ये लेक वाचवा लेक शिकवा अभियान असेही म्हटले जाते.

                 बेटी बचाओ, बेटी पढाओहे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आलेलं अभियान आहे. या अभियानाची ओळख ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यातर्फे २२ जानेवारी २०१५ रोजी हरियाणा मधील पानिपत मध्ये अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. संपूर्ण देशामधून ह्या अभियान चांगला प्रतिसाद मिळाला. ऑगस्ट २०१६ मध्ये २०१६ साल च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये कांस्य पदक मिळवणारी साक्षी मलिक हिलाबेटी बचाओ, बेटी पढाओअभियानाची ब्रँड अम्बॅसॅडर बनवण्यात आले. “बेटी बचाओ, बेटी पढाओअभियान घराघरात पोहचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #सेल्फीविथडॉटर(#SelfieWithdaughter) ह्या सोशिअल मीडिया हॅशटॅग ची ओळख करून दिली आणि जनतेला आपल्या मुलीसोबत फोट काढून ते #सेल्फीविथडॉटर(#SelfieWithdaughter) ह्या हॅशटॅग चा वापर करून अपलोड करण्याचे आवाहन दिले. ह्यामुळेबेटी बचाओ, बेटी पढाओअभियानावर जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळाली.