माझा आवडता
ॠतू
हिवाळा
My favorite season is
winter
हिवाळा म्हणजे, गवताच्या पातीवर सावरलेलं दव, सोनेरी किरणांनी नटलेली सकाळ, अंगणात खेळणारी थंडी. हिवाळा म्हणजे स्वेटरची शोधा-शोध, पहाटेचे धुके आणि गरम गरम चहा भजी. हिवाळा माझा आवडता ऋतू आहे. हिवाळ्यात सर्व वातावरण प्रसन्न असते, दिवसाचे उन्ह हि हवेहवेसे वाटते.
थंड वातावरणामुळे दमछाक होत नाही, दिवसभर ताजे तवाने वाटते. मला हिवाळा ऋतू आवडतो कारण यात उन्हाळ्याचा घाम नाही आणि पावसाचा चिखल हि नाही.
हिवाळ्याच्या अश्या आल्हाददायक वातावरणामुळे खूप लोक कुटुंबियांसोबत सहली काढतात. शाळेची वार्षिक सहल सुद्धा याच ऋतू मध्ये काढली जाते. हिवाळ्यातील प्रवास आपल्याला दमवत नाही या उलट पावसाने
रंगवलेले हिरवेगार डोंगर, पर्वत, दऱ्या निखळ पाण्याने वाहणाऱ्या नद्या सारा प्रवास एक सुखद अनुभव
बनवतात.
हिवाळ्याच्या थंड रात्री पांघरुणात शिरून झोपही छान लागते, सकाळी उठावेसे वाटत नाही. पण पहाटेच्या धुक्यात
फिरण्याची एक वेगळीच मजा
असते, अगदी ढगांमध्ये चालल्यासारखे वाटते. गुलाबी थंडी, धुके, सर्वत्र प्रसन्न वातावरण, हिवाळ्यातले दसरा, दिवाळी, क्रिसमस सारखे सण या सर्वांमुळे
मला हिवाळा ऋतू खूप आवडतो.
0 Comments