जागतिक पर्यावरण दिन
World
Environment Day
संयुक्त
राष्ट्रसंघाच्या जनरल असेंबलीने १९७२ च्या स्टॉकहोम येथील पर्यावरणविषयक परिषदेच्या निमित्ताने ‘५ जून’ हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जाहीर केला. पर्यावरणविषयक जागतिक जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याबाबत राजकीय सहाय्य व कृती वाढवण्यासाठी हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.
UNEP म्हणजे
United Nations Environment Programme द्वारे दरव्रषी
५ जून रोजी
जागतिक पर्यावरण दिन वेगवेगळ्या संकल्पना मांडून साजरा करण्याचे आव्हान केले जाते.‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात सर्व लोकांच्या सहभागाला महत्त्व असून यातून शासन, सामाजिक गट, कारखानदार या सर्वांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी प्रेरणा मिळते. जगभरातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये हा दिवस निरनिराळ्या पध्दतींनी साजरा केला जातो. यात पथयात्रा, हरित सोहळे, निबंध व पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम यासारखे उपक्रम राबविले जातात. हा दिवस साजरा करून आपण स्वत:ला व इतरांना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रेरित करत असतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.
दरवर्षी
५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून सुयोग्य अशा पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
पर्यावरण
(Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून निर्माण झालेली
सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील अत्याचाराचे भयावह परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या चांगल्या स्वरुपाबरोबरच त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागतील ह्याची प्रखर जाणीव झाली. म्हणून
इ. स. १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले.
तसे
पाहिले तर मानव हा पर्यावरणाचाच एक अत्यंत बुध्दीमान सजीव भाग म्हणा वा सजीव घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या इतर बहुतांशी सर्वच सजीव असो वा निर्जीव अशा प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे.
पर्यावरणाचा
र्हास थांबविण्यासाठी आम्ही सारे वसुंधरापुत्र मानव कटीबध्द आहोत ह्याचे सदैव भान राखू आपापल्या परीने आम्ही अंशत: का होईना हातभार लावू असा पर्यावरणाचा वसा घेतल्यास नक्कीच आपण खर्या अर्थाने आजचा जागतिक पर्यावरणाचा दिवसासाठी संकल्प केला असे म्हणता येईल.
0 Comments