मी पिंजऱ्यातील पोपट 
Mi pinnjaṟyatila popata


आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. तुम्ही माणसे तुमच्या आनंदासाठी आम्हांला पकडता, घरी आणता आणि पिंजऱ्यात ठेवता. पण आम्हांला काय वाटत असेल, याचा विचार तुम्ही माणसे करत नाहीत. हेच बघा ना! या घरात आज अनेक वर्षे मला पिंजऱ्यात ठेवलेले आहे. ही घरातील माणसे माझ्यावर खूप प्रेम करतात. मला आवडणारे पदार्थ खायला देतात. माझ्यासाठी खास पेरू आणतात. माझे नेहमी कौतुक करतात. येणाऱ्या पाहुण्यांपुढे माझे प्रदर्शन करतात. मला नवे नवे शब्द बोलायला शिकवतात. पण मला खरोखरीच काय हवे आहे, ते हे लोक समजून घेत नाहीत.


अगदी सोन्याचा पिंजरा असला, तरी तो मला नकोसा वाटतो. मला रानात मुक्तपणे विहार करायचा आहे. माझ्या भाऊबंदांबरोबर मला मोकळ्या आकाशात उडायचे आहे. मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, तुम्ही माणसे स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी झगडता, युद्धही करता; मग आमचे स्वातंत्र्य मात्र कसे हिरावून घेता?

मला आता या पिंजऱ्यातून मुक्त करा. मी तुम्हांला रोज भेटायला येईन.