लोकसंख्या वाढ परिणाम
Population Growth Impact


                पृथ्वीची निर्मिती . अब्ज वर्षांपूर्वी झाली होती आणि सूक्ष्मजीवांच्या रूपात जीवनाच्या अस्तित्वाची सुरुवात ही सुमारे . अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि त्यातूनच त्याच्या उत्क्रांतीची यात्रा सुरु झाली. आपले वंशज आग पेटवायला शिकले, गट तयार करणे आणि एकत्र राहणे सुरु केले. अशा प्रकारे हजारो वर्षांच्या  प्रगतीनंतर समाजाची संकल्पना जन्माला आली. मग हे समाज वाढू लागले, एकोप्यामुळे दीर्घ काळ जगू लागले, जगाची लोकसंख्या वाढायला लागली. पण अनेक महाभयंकर आजाराने प्रचंड प्रमाणात लोक मरत ही असत, जसे प्लेग आदी रोग.

                 सण १९२० नंतर जागतिक लोकसंख्येचा विस्फोट झाला. इथे आपण समजण्याचा प्रयत्न करू की १९२० नंतर असे काय झाले? २० व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली, माणसाची अवजड कामे मशीन्स करू लागली, नाना प्रकारचे शोध याच काळात लागले, गाड्या आल्या, मग टेलिग्राफ आले. विविध प्रकारच्या रोगांवर उपचार आले, व्यवसाय वाढले, जागतिक संपर्क वाढले. या सर्वांच्या फलस्वरूप माणसाचा जीवनकाळ वाढला आणि मृत्यु दर कमी झाला. वाढत्या समाजाला सपोर्ट करण्यासाठी वाढीव लोकसंख्येची गरज भासू लागली, म्हणून खूप साऱ्या देशांनीबेबी बूमर्सजनरेशन ला पाठिंबा दिला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, जगाची लोकसंख्या अभूतपूर्व दराने वाढू लागली.

लोकसंख्या वाढीची तुलना

                   आज जगाची लोकसंख्या जवळपास बिलियन म्हणजे ७०० करोड पेक्षा जास्त आहे, आणि ती .११% च्या वार्षिक दराने वाढत आहे. २०व्या शतकाच्या सुरवातीला जागतिक लोकसंख्या फक्त . बिलियन होती. जुलै १९७४ मध्ये ती वाढून बिलियन झाली, सन २००० मध्ये लोकसंख्या वाढून बिलियन झाली आणि आज २०१८ मध्ये ,५१५,२८४,१५३ म्हणजे जवळपास . बिलियन झाली आहे. असा अंदाज वर्तवला जातोय की २०४० मध्ये बिलियन तर २०६० मध्ये लोकसंख्या १० बिलियन म्हणजे १००० करोड होऊ शकते.

लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम / अडचणी / तोटे

(या भागामध्ये आपण भारताच्या लोकसंख्येबद्दल बोलूयात)

               जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या त्याच्या इष्टतम स्तरापेक्षाही वाढते, तेव्हा ती गंभीर समस्या बनते. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे खालील समस्या निर्माण झाल्या आहेत.

सुविधांचा अभाव

                 अन्नधान्याचा तुटवडाकुटुंबामध्ये जास्त माणसे वाढली तर त्या सर्वांना व्यवस्थित पोषक आहार योग्य त्या प्रमाणात मिळणे अशक्य होते. कारण जास्त माणसे असल्यामुळे उदरनिर्वाहाचा खर्च वाढतो. लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्याचा तुटवडा भासतो. कारण लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे शेतीला योग्य त्या प्रमाणात पाणी मिळत नाही आणि याचाच परिणाम शेतीच्या उत्पादनावर होतो. त्यामुळे महागाई वाढते कुटुंबाला पुरेसा आहार मिळणे कठीण होते.

                   वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य वैद्यकीय, स्वच्छता, अन्न आणि इतर अनेक सुविधा जनतेला पुरवताना सरकारला अडचण येते. सरकारी यंत्रणेमधला भ्रष्टाचार हा सुद्धा मोठा भाग आहेच, पण एवढ्या प्रचंड जनतेला मूलभूत सुख-सुविधा पोहचवणे सोपे काम नाही आहे. युरोपिअन किंवा अमेरिका देश त्यांच्या नागरिकांना मूलभूत सोयी खूप व्यवस्थित पुरवतात कारण भारताच्या तुलनेत त्यांची लोकसंख्या खूपच कमी आहे. स्वीडन आणि डेन्मार्क या देशातील नागरिक जगातले सगळ्यात आनंदी मानले जातात, या देशांची लोकसंख्या क्रमशः ९९ लाख आणि ५७ लाख इतकीच आहे. अमेरिका देश लोकसंख्येत तिसऱ्या क्रमांकावर येतो पण त्यांची लोकसंख्या ही फक्त ३२. करोड आहे, जी भारताच्या लोकसंख्या / आहे.

शिक्षण, बेरोजगारी आणि गरीबी

                  भारतातील वाढती लोकसंख्या ही भारतातील प्रचंड बेरोजगारीला कारणीभूत आहे. चांगल्या प्रतीचे शिक्षण सर्व भारतीयांना मिळत नाही, आणि जे कोणी शिकतात त्यांना नोकरी ही मिळत नाही. भारतात जेवढे लोक आहेत तेवढ्या नोकऱ्या भारतात तयार होतच नाही, आणि बिझनेससाठी ही म्हणावे असे अनुकूल वातावरण नाही.

प्रचंड गर्दी / शहरी स्थलांतरण

                  गावाकडे पुरेश्या करिअरसाठी संधी नसल्याने तरुण शहराकडे धावतात. यामुळे शहरात गर्दी होत आहे, शहरातील जागा, वाहतूक, पाणी पुरवठा यंत्रणा कमी पडते, स्थलांतरित लोक अनधिकृत झोपड्यांमध्ये खूप दयनीय परिस्थितीत राहतात, त्यांना चांगली वैद्यकीय सुविधा, शिक्षणही परवडत नाही आणि हे चक्र असेच चालू राहते.

पर्यावरण समस्या

                   एका लहान क्षेत्रात राहणा-या या प्रचंड लोकसंख्येने सभोवतालच्या वातावरणावर परिणाम नक्कीच होतो. इमारती, रस्ते बांधण्यासाठी डोंगर, झाडे कापली जातात. जळणासाठी, घरेबांधण्यासाठी तसेच फर्निचरसाठी माणूस वृक्षतोड करत असल्यामुळे याचा परिणाम निसर्गावरही होतो आणि त्यामुळेच पर्यावरणाचे संतुलन बिघडते. वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप होते, प्रदूषण वाढते, पाऊस वेळेवर पडत नाही. त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येमुळे जल प्रदूषण, वायू प्रदूषण वाढते. पाणी, माती, हवा प्रदूषित होत आहे. जंगली प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आहेत. जंगली प्राणी शहरांत घुसून भयाचे वातावरण निर्माण करतात. अजूनही ग्रामीण भागात शेकडो वर्ष जुन्या प्रकारे शेती केली जाते, त्यामध्ये खूप सारी झाडे तोडली जातात, मातीची झीज होते; सुपीक मातीचा थर निघून गेल्याने पीकही योग्य प्रमाणात येत नाही. जळणासाठीही खूप प्रमाणात लाकूडतोड होत आहे.  वृक्षतोडीमुळेच पृथ्वीवरील प्रदूषण खूप जास्त प्रमाणात वाढत आहे.

वाढती लोकसंख्या लाभ / फायदे

                  वाढत्या लोकसंख्येचे फायदेही असू शकतात, हे तसे ऐकायला विचित्र वाटते पण असं होऊ शकते. प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या ही भारतासाठी एक गंभीर समस्या बनली असली तरी ती एका चांगल्या संधीमध्ये बदलली जाऊ शकते. चला लोकसंख्येचे फायदे किंवा सकारात्मक परिणाम काय आहेत ते जाणून घेऊयात.

                    भारतात ५०% पेक्षा जास्त जनता वयोवर्ष ३५ खाली आहे, म्हणून भारताला एक तरुण देश म्हणून संबोधलं जात आणि ही एक उत्तम गोष्ट आहे. जपान आणि काही युरोपिअन विकसित देशांमध्ये जवान नागरिक खूप कमी आहेत, कुठलाही देश चालवण्यासाठी तरुण कामगार, नोकरवर्ग, प्रशासन अधिकारी खूप गरजेचे असतात. भारताकडे ते भरभरून आहेत, त्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर आपल्या देशामध्ये खूप चांगल्या नोकऱ्या हे मिळवू शकतात. आणि इतर देशांमध्ये सुद्धा हे तरुण चांगल्या रीतीने आपल्या देशाचे नाव पुढे आणू शकतील.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही गोष्ट जाणली आहे, त्यांनीस्किल इंडिया”, “स्टार्टअप इंडिया”, “मेक इन इंडियासारख्या योजना राबवल्या आहेत, यातून भारतीय जनतेला जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे.