Hindi Essays, English Essays, Hindi Articles, Hindi Jokes, Hindi News, Hindi Nibandh, Hindi Letter Writing, Hindi Quotes, Hindi Biographies

Marathi Essay on Swachh Bharat Abhiyan", " स्वच्छ भारत अभियान " for Kids and Students.


स्वच्छ भारत अभियान 
Swachh Bharat Abhiyan

                  भारत सरकारचा स्वच्छ भारत मोहिम सुरु करण्याचा हा प्रथमच प्रयत्न नाही. १९९९ मध्ये, भारत सरकारनेसंपूर्ण स्वच्छता अभियानसुरू केले जे नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याचेनिर्मल भारत अभियानअसे नामकरण केले. परंतु, स्वच्छ भारत अभियानाला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली संजीवनी मिळाली. आपल्या शपथविधीमध्ये सौच आणि स्वच्छता वरती बोलणारे ते जगातील पहिलेच नेते असावेत. यातून त्यांची स्वच्छतेबद्दलची आवड आणि संकल्प ही दिसतो. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबविली आणि नागरिकांना भाग घेण्यास आवाहन केले. त्यांनी स्वतः झाडू हातात घेतला, काहींना हे राजकीय स्टंट वाटू शकतो, पण यासर्वातून एक फायदा झाला कि आपण भारतीय लोग स्वच्छतेबद्दल बोलू लागलो, वादविवाद, चर्चा होऊ लागली.

                   स्वच्छ भारत अभियानाने भारतातील स्वच्छता आणि त्याच्या निगडित कामांवर प्रचंड प्रभाव पाडला आहे आणि दिवसेंदिवस मोहिमेची प्रगती होत आहे. स्वच्छ भारत अभियान मोहिमेची स्वतःची अधिकृत वेबसाइट अॅप आहे जेथे आपण या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेऊ शकतो. अजून पर्यंत ३१ ,४०८ ,२८० घरांत शौचालये बांधली गेली, १४३,४९१ गावे/ ७९ जिल्हे / राज्ये खुल्या शौचापासून मुक्त झाली आहेत. विविध राजकारणी, सेलिब्रिटिज, अभिनेते आणि क्रीडापटूंनी या मोहिमेत सहभाग घेतला होता आणि या अभियानाची क्षमता आणि पोहोच वाढवून दिली. सचिन तेंडुलकर, कमल हसन, अनिल अंबानी, विराट कोहली, प्रियांका चोप्रा आणि असेच अनेक जणांनी झाडू हातात घेतला आणि रस्ते साफ केले. मोदींच्या या अभियानाचा एक चांगला प्रचार केला. या मोहिमेचे लक्ष्य आहे की, महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती पर्यंत ग्रामीण भारतात १२ दशलक्ष शौचालये, तसेच शहरांत स्वच्छतेसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.

                  २०१९ पर्यंत भारताला ओपन डेफकेशन फ्री (ओडीएफ) बनवणे हे स्वछ भारत अभियानाचा प्राथमिक उद्दिष्ट आहे. स्वच्छ भारत अभियान हा एक खूप मोठा प्रकल्प आहे आणि ३० लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी तसेच शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतला आहे, या मोहिमे अंतर्गत भारताच्या ४०४१ शहरे आणि गावांना .९६ लाख कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

                    या मोहिमेने केलेल्या जागृतीने अनपेक्षित बदल घडत आहेत, भारतातील हिंदी चित्रपट जगतातील (बॉलीवूड) सुपरस्टार अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्याशौचालयनावाच्या चित्रपटाद्वारे भारतातील खुल्या शौचाच्या समस्येच्या निर्मूलनास समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. हा चित्रपट ग्रामीण भारतातील स्त्रियांच्या समस्यांवर प्रकाश टाकतो, ग्रामीण भागात शौचालये बांधण्याची आवश्यकता आहे. असा विषय एका दिग्गज कलाकाराने करणे मोठी गोष्ट आहे, याचा अर्थ असा आहे की स्वछता विषयावर लोग आता विचार करू लागली आहेत.

स्वच्छतेचे फायदे / महत्व

                   आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण कोणाला नकोसे असते. स्वच्छतेने रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत, आणि आपली जीवन शैलीही बदलून जाते. स्वच्छ परिसरातील लोग मॉर्निंग वॉल्क किंवा जॉगिंग ला जास्त जातं दिसतात, अश्या चांगल्या सवयीचा आपली जीवनावर खूप परिणाम होतो. स्वच्छ पटांगणात मुले खेळतात, आपले विडिओ गेम, मोबाईल दूर करून मैदानात येतात, ऍक्टिव्ह होतात. याचा फायदा असा होतो कि मुलांचा अभ्यासाचा ताण कमी होतो, ती खूष राहू लागतात.

                    आपल्याया हे सगळे माहीत आहे, पण तरीही आपण या साठी काहीच करत नाही. आपण आपले घर स्वछ ठेवतो आणि परिसराकडे दुर्लक्ष करतो. घर आपले परिसर दुसर्यांचा या विचाराने आपल्या भारताचा ऱ्हास केला आहे. स्वच्छता हे फक्त सरकार चे काम नाही, हां त्यांची जबाबदारी जरूर आहे. सरकारने योग्य त्या सुविधा पुरवल्यातच पाहिजेत. पण जो पर्यंत आपण स्वच्छता-प्रिय होत नाही, स्वच्छतेचे महत्व, फायदे जाणून घेत नाही तो पर्यंत काहीही बदल होणार नाही.

                   जर आपल्याला स्वच्छ भारतचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर, सरकार आणि आपल्याला एकत्र काम करावेच लागेल. सरकारच्यास्वच्छ भारत अभियानमध्ये भाग घ्यावा लागेल.अश्या मोहिमेचा साथ दिला पाहिजे.Post a Comment

0 Comments