मी पंतप्रधान झालो 
I Became the Prime Minister


माझ्या देशाची उच्च सांस्कृतिक परंपरा, चमकदार इतिहास, त्यातील नररत्ने, सामर्थ्यशील शालीनता हे सारे मला या देशाचा पंतप्रधान होण्यास मोह पाडतात. हा काटेरी मुकुट म्हणूनच मी आनंदाने स्वीकारण्यास तयार आहे.


आज देशातील राजकारण कसे आहे ? गटबाजी, भ्रष्टाचार, तोडाफोडाची नीती, सत्तेसाठी चाललेली लाजिरवाणी स्पर्धा...सारेच ओंगळ आहे. दारिद्र्य, अशिक्षितपणा, मागासलेपण देश खाईत नेत आहे....मी हे सारं बदलू इच्छितो. “ सोपे नाही' याची कल्पना आहे. कारण ' लोकशाही हे गाढवांचे राज्य असते' असे म्हटले जाते तिथे लाथांचा सुकाळ असणारच.


पण अब्राहम लिंकनने म्हटल्याप्रमाणे “लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही" हे मी बिंबविण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करीन.


मी काही ' केंबिज' किंवा 'डून स्कूल'चा वारसदार नाही. मी याच मातीतला असल्याने या मातीचे प्रश्न मला चांगलेच माहीत आहेत म्हणूनच ते प्रश्न सोडवण्याच्या माझ्या प्रयत्नांना जास्त यश येईल.


आपला देश शेतीप्रधान असल्याने शेतकरी हा केंद्रबिंदू धरून सरकारी धोरणे राबवण्याचा माझा मानस आहे. त्याला सवलती कर्जे, आधुनिक तंत्रज्ञान, खते पुरवीन पण कर्जमाफी करून त्यांची क्रियाशीलता आणि देशाची तिजोरी दुबळी करणार नाही नाही. गंगा-कावरी प्रकल्पान सारा भारत पावसावर अवलंबून न राहता

होईल. तो मी करीन म्हणजे मुकलेली जमीन अन् सुकलेला शेतकऱ्याचा चेहरा भारतात कुणाला दिसणार नाही.


तळागाळाच्या साऱ्याच जनतेला अन्न, वर, निवारा मिळालाच पाहिजे याकडे माझा कटाक्ष राहील.

पांढरपेशा वर्गाचे हाल अधिकच आहेत. कर आणि महागाईच्या कैचीत तो सापडला आहे. मी कर आकारणी सुलभ करीन. बाजारभाव नियंत्रित करीन. समाजवाद आणि भांडवलशाही या दोन्हींची सांगड मी घालीन. समाजवादाने व्यक्तिगत कौशल्य मारले जाते तर भांडवलशाहीत पिळवणूक होते. राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्या दोन्हींचा यथायोग्य वापर मी करीन. समाजातील उच्चभ्रूना या माझ्या धोरणाचा फायदा मिळेल.


लोकसंख्येचा विस्फोट ही आपली खरी समस्या. मर्यादित कुटुंबावर सवलतींचा वर्षाव करीन किंवा कायदाच संमत करून घेईन. माझी धोरण अंमलात आणण्यासाठी प्रामाणिक, नीतिमान् , कार्यक्षम, न्यायी मंत्र्यांची निवड करीन. कायदा व सुव्यवस्थेचे तंतोतंत पालन करीन. मी रामराज्य आणू शकेन असा दावा मी करत नाही. वाईट काही असेलच पण अल्प. आणि राष्ट्राच्या प्रगतीला आड येणार नाही इतपत ! ' लाल फिती'चा अडसर दूर करून वेगाने कामं करीन, कारण कामासाठी मला फक्त ५ वर्षच हाती असतील आणि मला तर खूप काही करायचंय