ज्योतिबा फुले 
Jyotirao Phule

थोर क्रांतिकारक विचारवंत व आदयसुधारक महात्मा  ज्योतिबा  फुले यांचा जन्म पुणे येथे १८२७ साली झाला. त्यांनीच महाराष्ट्रात सुधारणेची पुरोगामी परंपरा सुरू केली. वर्तमानात आपल्या भोवताली समाजात आढळणाऱ्या उणिवा, दोष, त्रुटी पाहून भविष्यात त्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधून काढणारा आणि त्या मार्गावर अगदी एकाकी पण बेधडकपणे वाटचाल करणाराच खरा समाजसेवक, समाजहितचिंतक बनू शकतो. 


याचा प्रत्यय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रातून येतो. नवव्या वर्षी वैधव्य आल्यामुळे वपन करून विद्रूप करण्यात आलेल्या गुरुकन्येला पाहून ज्योतिबांंच्या  मनाला धक्का बसला. या आपल्या भगिनीसाठी काहीतरी करायलाच हवे हे त्यांच्या मनाने घेतले. असे  कृत्य करायला 'धर्माची आज्ञा' हे एकटेच कारण असते, हे त्यां च्यान गुरूंच्या तोंडून प्रत्येक्ष ऐकल्याावर, तेव्हाी त्यां नी आपल्या धर्माविषयी सत्यशोधन करायचेच असा पक्काा निर्णय त्यांणनी तरूण वयात घेतला. 

पुण्यात बुधवारवाड्यात पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांनी शाळा काढली होती. जोतिबा त्या शाळेत जाऊ लागले. तेव्हा त्यांच्या वडिलांचा गोविंदराव फुले यांचा ज्योतिबांंच्या शिक्षणाला सहमत नव्ह्ते. ज्योतिबांंनी इंग्रजीबरोबरच संस्कृतचेही अध्ययन केले. त्यांचे विचार हे सुरुवातीला बंडखोरीचे होते.


त्यांनाही इतरांप्रमाणे इंग्रजांशी लढण्यासाठी शस्त्रविदया शिकावी असे वाटत होते, पण त्याच वेळी आपल्या समाजातील जातिभेद, अज्ञान आणि स्त्रियांच्या वाट्याला येणारी दुर्दशा त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांनी इतर धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांपैकी ख्रिस्ती धर्मातील माणुसकीची वागणूक, सेवा, समानता या गोष्टींचे त्यांना विशेष आकर्षण वाटले. येथेच ज्योतिबांंना आपल्या कार्याचा मार्ग सापडला आणि तो कृतीत आणण्यास त्यांनी सुरुवात केली.

समाजातील  विशेषतः स्त्रियांमधील  अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी जोगेश्वरीच्या बोळातील चिपळूणकरांच्या वाड्यात १८४८ साली पहिली मुलींची शाळा काढली. मुलींना शिकवण्यासाठी स्त्री शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला  सावित्रीबाईंना  तयार केले. स्त्रीशिक्षणाच्या आग्रही प्रयत्नामुळे समाजाचा प्रचंड रोष या पतिपत्नीला सहन करावा लागला. ज्योतिबांंच्या वडिलांनी ज्योतिबांंना व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले.


 नंतर ज्योतिबांंनी मीठगंज भागात १८५१ साली दलित वस्तीत मुलींसाठी शाळा काढली. मागासलेल्यांना सुधारायचे तर त्यांच्यामध्येच जाऊन राहिले पाहिजे, म्हणून त्यांनी आपले घर बदलले. दलितांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपल्या घरातील हौद सर्वांना खुला केला. समाजातील उच्चवर्णीयांतील स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून या अभागी स्त्रियांसाठी त्यांनी १८६३ साली 'बालहत्याप्रतिबंधक गृह' सुरू करून अशा स्त्रियांना आश्रय दिला.


ज्योतिबांं हे कर्ते सुधारक होते. अशाच एका अडलेल्या स्त्रीला आश्रय देऊन तिच्या मुलाला ज्योतिबांंनी दत्तक .   घेऊन सांभाळ केला ते निर्भय वृत्तीचे होते. त्याामुळे आलेल्यात संकटाना त्यां नी मोठ्या धैर्याने तोंड दिले. शेतकऱ्याच्या पोशाखात ते 'ड्युक ऑफ कॅनॉट' यांच्या भेटीला गेले. शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी समजावून घेतले होते व त्याबाबतची त्यांची परखड मते त्यांच्या शेतकऱ्याचा असूड' (१८८३) या पुस्तकात व्यक्त झाली आहेत.

अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आयुष्यभर ते झगडत राहिले, त्यासाठी त्यांनी १८७३ साली 'सत्यशोधक समाज' स्थापन केला. हजारो अनुयायी घडवले. विदया, सत्य आणि सत्शील यांचाच सदैव आग्रह धरला. म्हणूनच जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना 'महात्मा' म्हणून गौरविले. जोतिबा फुले यांनी समाजाला सत्य आणि समता या तत्त्वांचा सक्रिय संदेश दिला व २७ नोव्हेंबर १८८९ साली त्यांच्या लाडक्या जनतेचा त्यांनी निरोप घेतला. ज्योतिबांं गेले, पण त्यांच्या महान कार्याने ते अमर झाले.