Hindi Essays, English Essays, Hindi Articles, Hindi Jokes, Hindi News, Hindi Nibandh, Hindi Letter Writing, Hindi Quotes, Hindi Biographies

Marathi Essay on "My Younger Brother", "माझा धाकटा भाऊ " for Kids, Students, Marathi Essay, Paragraph, Speech for class 7, 8, 9, 10, and 12 Exam.

माझा धाकटा भाऊ 
My Younger Brother

माझा धाकटा भाऊ हे आमच्या घरचं एक वेगळंच प्रकरण आहे. हे राजश्री आता पाच वर्षांचे आहेत, पण हयांनी आताच आमच्या घरात आपले एक आगळे स्थान निर्माण केले आहे. हा माझा छोटा भाऊ माझ्याहन दहा वर्षांनी लहान आहे. पण हे अंतर बहधा त्याला कधीच मान्य नसावे. कारण प्रत्येक बाबतीत तो माझ्याशी आपली बरोबरी करीत असतो. यंदा मी दहावीत आल्यामुळे मला गणवेषाची फुल पॅन्ट शिवल्यावर राजश्रींनाही फुल पॅन्ट हवी झाली. हा माझा धाकटा भाऊ दिसावयास इतका सुरेख आहे की, त्याला काहीही शोभून दिसते.

 

हो, सांगायचे राहिले. माझ्या या छोट्या भावाचे नाव आहे आनंद आणि माझे नाव अमित. असा हा 'अमित-आनंद' आहे. आम्ही त्याला लाडिकपणे नंदू म्हणतो. नंदू स्वतःला लहान मानत नाही, पण नंदूच्या आगमनानंतर आमचे सारे घरच लहान होऊन गेले आहे, साऱ्यांचे बालपण जणू पुन्हा अवतरले आहे. बाबा नंदूबरोबर खेळताना घोडा होतात, हत्ती बनून स्वतःला सोंड लावतात, उंट होऊन अंगाचे तीन तुकडे करून घेतात. आजोबासुद्धा नंदूबरोबर ढाल-तलवार घेऊन लूटपुटचे युद्ध करतात. नंदू आईला आपल्याबरोबर बोबडे बोल बोलायला लावतो तर आजीला एकसारखे उखाणे घालतो.


नंदू जरी घरात सर्वांत छोटा असला तरी नंदूचे प्रस्थ सर्वांत मोठे. नंदूचा वाढदिवस हा आमच्या कुटुंबातील एक मोठा सोहळा असतो. मी जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही भाड्याच्या जागेत राहत होतो. पण नंदू जन्माला आला तो आमच्या मालकीच्या घरात, स्वतःच्या गाडीतून तो प्रथम आपल्या घरी आला. त्यामुळे नंदूचे सारे बालपण आनंदात व वैभवात न्हाऊन निघत आहे. आपले सर्व हक्क बजावण्यासाठी व सर्वांकडून कौतुक करून घेण्यासाठी नंदू नेहमी जागरूक असतो. त्याच्या वाढदिवसाचा महिना आला की तो विचारतो, “हं दादा, कोणता महिना आहे ? मार्च ना! १० तारीख जवळ आली हं!' मग मी मुद्दामच अज्ञान ओढवून घेऊन म्हणतो, “काय आहे बुवा १० तारखेला?” “अरे विसरलास? माझा वाढदिवस नाही का?'' नंदू चटकन सांगून टाकतो. अशी आठवण तो प्रत्येकाला करून देत असतो. त्या दिवसाचा त्याचा आनंद साऱ्या घरभर ओसंडत असतो. नंदूचे सारे वागणेच कसे ऐटबाज!


बेटयाला अदयापि एकही अक्षर वाचता येत नाही. पण वृत्तपत्र हातात पडले की याचा आव असतो मोठ्या विद्वानाचा. तो पाहणार केवळ फोटो, त्यांत क्रिकेटचे विशेष. मग प्रश्नांची मालिका सुरू, ‘दादा, यांतला गावसकर कोण?' कपिल मात्र त्याला बरोबर ओळखता येतो. दूरचित्रवाणीवरील 'खेळीयाड' या कार्यक्रमाची वेळ तो कधी विसरणार नाही हं! आणि गंमत सांगू का? नंदूच्या महत्त्वाकांक्षा नेहमी खेळानुरूप बदलत असतात. म्हणजे कसोटी सामने सुरू झाले की नंदू गावसकर' होणार असतो; तर टेनिसचे सामने सुरू झाले की त्याचा आदर्श असतो 'विजय अमृतराज'. कधी तो 'पेले'सारखा फूटबॉल खेळणार असे जाहीर करतो; तर कधी मिहीर सेन'सारखी इंग्लिश खाडी पोहोण्याचे ठरवितो. मग मी त्याला गमतीने म्हणतो, “नंदू, तू आपला 'सत्पाल' हो. तेच बरं, खाणंखुराक भरपूर.” मग मात्र नंदू चिडतो.


'बालकवर्षा'त त्याने धमालच उडविली होती. प्रथम त्याने लाडीगोडीने बोलून आईकडून बालकवर्षाचा अर्थ समजावून घेतला, तेव्हा आईला त्याचे कौतुक वाटले, त्याच्या जिज्ञासेला आईने गौरविले. पण नंतर हे 'बूमरँग' आईवर चांगलेच उलटले. आपला कोणताही हट्ट, आपली कोणतीही मागणी मांडताना नंदू ‘बालकवर्षा'ची आठवण देऊन ती पुरी करून घेत असे. असा आहे हा महाबिलंदर, माझा धाकटा भाऊ आनंद!Post a Comment

0 Comments