Hindi Essays, English Essays, Hindi Articles, Hindi Jokes, Hindi News, Hindi Nibandh, Hindi Letter Writing, Hindi Quotes, Hindi Biographies

Marathi Essay on "Shram Pratishtha", "श्रमप्रतिष्ठा " for Kids, Students, Marathi Essay, Paragraph, Speech for class 7, 8, 9, 10, and 12 Exam.

श्रमप्रतिष्ठा 
Shram Pratishtha


प्रतिष्ठेच्या कल्पना' हया माणसामाणसांत अंतर निर्माण करतात हा नेहमीचा अनुभव आहे. आपल्याकडे अनेकदा ही प्रतिष्ठा घराणे, धन, समाजातील स्थान यांवर ठरविली जाते. जमीनदार, सावकार यांच्या घराला दारिद्रयाने पोखरलेले असले तरी प्रतिष्ठेच्या जुन्या, चुकीच्या कल्पनांतून त्यांना समाजात श्रेष्ठत्व मिळते. मग त्यांच्या अवगुणांनाही गुणस्वरूप प्राप्त होते. अशी ही दुर्वर्तनी माणसे इतरांना तापदायक ठरतात.

 

प्रतिष्ठेच्या पोकळ कल्पना उराशी बाळगणारी काही माणसे त्या कल्पनांतून आपलीही दुरवस्था ओढवून घेतात. एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या घरातील चंचल लक्ष्मी त्या घरातून बाहेर पडते. मग त्या घरात साम्राज्य सुरू होते. लक्ष्मीच्या सावत्र बहिणीचे-आक्काबाईचे. घरातील माणसांची उपासमार सुरू होते. तरीपण या एकेकाळच्या संपन्न घरातील माणसे हातपाय हलवून घराबाहेर कामासाठी पडत नाहीत. कारण तेथे त्यांची प्रतिष्ठा आड येत असते.


प्रतिष्ठेच्या या कल्पना आपल्या देशात 'चातुर्वर्ण्याच्या कल्पनेवर आधारलेल्या आहेत. श्रमविभागणी करण्यासाठी पूर्वीच्या विशिष्ट समाजरचनेत चातुर्वर्ण्य पद्धती स्वीकारली गेली. पण ब्राह्मण, क्षत्रिय या वर्गांनी स्वतःकडे उच्चत्व घेतले व शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना कुणबी ठरवून कमी लेखले; तेव्हापासून आपल्या देशात राबणारा शेतकरी, यंत्रामागील कामगार, इतर हलकी पण कष्टाची कामे करणारे कनिष्ठ, समाजाच्या खालच्या पातळीवरचे मानले जाऊ लागले आणि त्यांची कामे कमी प्रतिष्ठेची मानली जाऊ लागली.


याच कल्पनेतून आपल्या देशाचे अनहित ओढवले. माणसे करण्याचे टाळू लागली आणि सर्वांना कमी श्रमांची, पांढरपेशी कामे हवीशी वाटू लागली. आळसाला थारा मिळाला आणि देशाची प्रगती खंटली. याउलट श्रमांना योग्य प्रतिष्ठा असलेला जपान देश मात्र आज विश्वात अग्रेसरत्व प्राप्त करू शकला आहे.

 

नव्या युगात हे सत्य आता आपल्या देशानेही ओळखले आहे. कवी मर्डेकर कारखान्यांत खपणाऱ्या कामगाराला 'नच्या मनचा गिरिधर म्हणतात. तर शेतात कष्टणाऱ्या शेतकऱ्याचा उल्लेख महात्माजी अन्नदाता' असा करतात. मातीत काम करण्यात कोणताही कमीपणा नाही, ही पाश्चात्यांची कल्पना आता सर्वत्र स्वीकारली जात आहे आणि आपल्या देशातही श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.Post a Comment

0 Comments