स्वामी विवेकानंद 
Swami Vivekananda


स्वामी विवेकानंद यांनी  भारताचे व हिंदू धर्माचे नाव नाव संपुर्ण विश्‍वात कश्‍याप्रकारे केले त्‍यांच्‍या बालपणा गमती जमती , त्‍यांनी केलेली भारत भ्रमंती ,  यांचे वर्णन खालील २  निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील विश्वनाथ दत्त यांच्या घरी १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. विश्वनाथ दत्त यांच्या पत्नी भुवनेश्वरी देवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी शिवाचे कठीण व्रत सुरू केले होते. या व्रतामुळेच आपल्याला पुत्ररत्‍न लाभले, अशी त्यांची भावना होती. मोठ्या कौतुकाने त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'नरेंद्र' असे ठेवले.

नरेंद्र हा बालवयात कोपिष्ट होता. शाळेतही तो फार खोड्या काढत असे. पण पुढे त्याच्यात पूजाअर्चा, भक्तिभाव यांची आवड निर्माण झाली. नरेंद्राला तीव्र बुद्धि्मत्तेचे वरदान लाभले होते. नित्यनेमाने व्यायामशाळेत जाऊन त्याने आपले शरीर सुदृढ बनवले होते. मोठा झाल्यावर नरेंद्र ब्राम्‍हणसमाजात जाऊ लागला. तेथे त्याच्या मनात देवाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. 'खरोखरच देव आहे की नाही? देव असेल तर तो कोठे भेटेल?' नरेंद्र ज्याला-त्याला हे प्रश्न विचारत असे. तेव्हा ब्राहमसमाजवादी पुढारी देवेंद्र यांनी नरेंद्राला स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे पाठवले आणि पुढे तेच नरेंद्राचे गुरू झाले.

परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो मानवातही आहे, ही शिकवण परमहंसांनी नरेंद्राला दिली. सुरवातीला नरेंद्राला हे मान्य झाले नाही. नंतर परमहंसांच्या शिकवणीतून हे सत्य नरेंद्राला प्रतीत झाले. तो कालिमातेचा भक्त बनला. रामकृष्ण परमहंसांनी या जगाचा निरोप घेताना नरेंद्राला सांगितले की, तू हिंदुत्वाचा प्रसार कर आणि त्यातील अमर तत्त्वज्ञान साऱ्या जगाला सांग.

१८९३ मध्ये नरेंद्र अमेरिकेतील सर्वधर्मीय परिषदेला उपस्थित राहिले. लोक त्यांना 'स्वामी विवेकानंद' म्हणून ओळखू लागले. त्या जागतिक परिषदेत विवेकानंदांनी भाषणाला सुरवात करताना 'सभ्य स्त्री-पुरुषहो' असे न संबोधता 'माझ्या बंधु-भगिनींनो' असे संबोधून उपस्थितांची मने जिंकली. त्या सभेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचे माहात्म्य सर्वांना पटवून दिले. आपले उर्वरित आयुष्यही त्यांनी या महान कार्यासाठी वेचले.