Hindi Essays, English Essays, Hindi Articles, Hindi Jokes, Hindi News, Hindi Nibandh, Hindi Letter Writing, Hindi Quotes, Hindi Biographies

Marathi Essay on "The Statue of Tilak began to Speak", "टिळकांचा पुतळा बोलू लागला " for Kids, Students, Marathi Essay, Paragraph, Speech for class 7, 8, 9, 10, and 12 Exam.

टिळकांचा पुतळा बोलू लागला 
The Statue of Tilak began to Speak


टिळक स्मारक मंदिरातून 'टिळक-आगरकर' हे नाटक पाहून मी बाहेर पडत होतो. नाटकातील मित्रप्रेमाची ती उदात्त दृश्ये मनःपटलावरून हलत नव्हती; त्यामुळे नाटकाला आलेल्या मंडळींची गर्दी ओसरली तरी मी तेथेच रेंगाळत राहिलो. तेथील कट्ट्यावर थोडा वेळ टेकलो. अचानक एक धीरगंभीर आवाज कानांवर आला. मी चमकून पाहिले. तर काय...... प्रत्यक्ष लोकमान्यांचा पुतळाच माझ्याशी बोलत होता. मी कान देऊन ऐक लागलो. त्या आवाजात खंत होती.


“अरे बाळा, तू येथे का रेंगाळत आहेस ते मला माहीत आहे. रंगमंचावरील नाटकाने तुझ्या मनाची पकड घेतली आहे याची मला कल्पना आहे. खरोखरच नाटककाराने आमच्या दोघांच्या जीवनातील वास्तवतेशी बरीच जवळीक साधली आहे. परंतु खरे तर आमच्या जीवनातील एकदशांश भाग देखील नाटकात दाखविला गेलेला नाही पण त्यात नाटककाराचा दोष नाही. तो तरी काय करणार? त्याला स्थलकालाच्या मर्यादा आहेतच. पण मुला, मी आज तुझ्याशी बोलू इच्छित आहे ते नाटकाविषयी नाही, तर देशाच्या सदयःस्थितीविषयी मला तुझ्याशी बोलायचंय.


“अरे, मी येथे या चबुतऱ्यावर उभा आहे. भोवताली घडत आहे ते सर्व पाहत आहे. या टिळक रस्त्यावरून सकाळ-संध्याकाळ शाळा-कॉलेजला जाणारे अनेक विदयार्थी मला दिसतात ना, तेव्हा मन आनंदाने बहरून जाते बघ. या विदयार्थ्यांना पाहून, आम्ही शाळा सुरू केली तेव्हाचे दिवस आठवतात. शाळा सारवण्यापासून सर्व कामे आम्ही केली होती. केवढी स्वप्ने आम्ही तेव्हा पाहिली होती. पण आज मी जेव्हा या मुलांच्या गप्पा ऐकतो, तेव्हा मन खंतावते. अरे, आपण भारत देशात राहतो याची त्यांना आठवणही. नसते! या देशाला स्वराज्य मिळावे म्हणून त्यांच्या पूर्वजांनी जिवाचे रान केले; त्यावेळी कित्येकांनी आपल्या सुखांचा होम केला. त्यावेळी अनेकांनी अखंड छळ, कारावास सोसला तो कशासाठी? तर हे स्वराज्य मिळविण्यासाठी. आज त्यांची नातवंडे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वराज्याचा लिलावही करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असे भीषण चित्र दिसत आहे. या स्वराज्याचे आपण काही देणे लागतो याची त्यांना जाणीवही नाही. स्वदेशी, स्वभाषा यांचा त्यांना विसर पडला आहे. परदेशी वस्तूंचा हव्यास, इंग्रजी भाषेची गुलामगिरी पाहिली की वाटते- 'याचसाठी का आम्ही अट्टाहास केला होता?'


“या तरुणांची कृश शरीरयष्टी पाहून वाटते की, वर्षभर शाळा-कॉलेजांना कुलुपे घालावी आणि यांना व्यायामशाळेत न्यावे. मंडईच्या आसपास रेंगाळलो तरी हेच आढळते. जोर-बैठका काढणारे पहिलवान आता दिसत नाहीत. चित्रपटांच्या गप्पांत रंगलेले 'हीरो'च सर्वत्र आढळतात. रस्त्यावरून हिंडताना विविध जातिजमातींच्या संस्था आढळतात. म्हणजे विषमता एवढी फोफावली आहे तर! दलित हा शब्दही आमच्या काळात अस्तित्वात नव्हता. जात-धर्मभेद विसरून सगळे एकाच ध्येयाने प्रेरित झाले होते. 'तेल्यातांबोळ्यांचे पुढारी' म्हणवून घेण्यात कधी शरम वाटत नव्हती. तेव्हा एकच ध्येय होते आणि ते म्हणजे परक्या सरकारला हाकलणे. पण आजचे जीवन ध्येयहीन झाले.


"केवढ्या उमेदीने आम्ही 'केसरी' सुरू केला आणि वाढविला. पण आजच्या वर्तमानपत्रांमध्ये तो स्वाभिमानी बाणाच आढळत नाही. आजची वर्तमानपत्रे चाळली तर निम्म्याहून अधिक भाग जाहिरातींनी भरलेला दिसतो. अरेरे, हे सारे पाहिले की गपकन् डोळे मिटावेसे वाटतात." आवाज थांबला, मी पुतळयाकडे पाहिले, तर पुतळ्याचे डोळे खरंच मिटलेले होते.Post a Comment

0 Comments