किती चतूर बायका
What a clever Wife
एक गृहस्थ सकाळी सकाळीच आपल्या बायकोवर अत्यंत शुल्लक अशा कारणास्तव रागावला. अगदी तोंडातून एक शब्दही न काढता तो घरात वावरत होता. दुपारचं जेवणसुध्दा त्यानं मिटल्या तोंडानं घेतलंदिवस अशा तर्हेने सरला. संध्याकाळ झाली नव्हे रात्रही झाली आणि चूपचाप जेवून तो झोपायच्या खोलीत गेला व दिवा न लावता अंथरुणावर आडवा झाला.
राग असो वा लोभ असो, तो मर्यादेनंच शोभून दिसतो. सुंदर दिसणारं बाळसेदार शरीरसुद्धा अति बाळसेदार झालं की बेढब दिसू लागत. ‘ह्यांच’' वागणसुध्दा असंच मर्यादा सोडून नाही का ? भांडणाचं कारण ते क्षुल्लक, आणि त्याकरिता यांनी दिवसभर रागावून रहावं ? ते काही नाही; यांच्या रागावर काहीतरी औषध शोधून काढलंच पाहिजे, असा विचार करुन त्या गृहस्थाच्या चतूर बायकोनं एक मेणबत्ती पेटविली आणि ज्या खोलीत तो झोपला होता, त्या खोलीचा कानाकोपरा ती त्या मेणबत्तीच्या प्रकाशात धुंडाळू लागली.
बराच वेळ झाला तरी आपल्या बायकोचं धुंडाळणं संपत नाहिसे पाहून उत्कंठेपोटी तोंड उघडून अखेर त्या गृहस्थानं तिला विचारलं, ‘काय गं? काय शोधते आहेस?’यावर ती म्हणाली, ‘सकाळपासून तुमची वाचा कुठे गडप झाली, ती शोधत होते पण अखेर सापडली ”तिच्या या अनपेक्षित पण चातुर्यपूर्ण उत्तरानं त्या गॄहस्थाला एकदम हसू फुटलं व बायकोवरचा त्याचा राग कुठल्याकुठे निघून गेला !
0 Comments